आज दिनांक 7 मार्च 2025 रोजी सकाळी तेजस एक्सप्रेसने नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री कॉम्रेड वेणू पी नायर यांचे रत्नागिरी स्थानकात आगमन झाले रत्नागिरी विभागातल्या कर्मचारी व पदाधिकारी वर्गाने महामंत्र्यांचे जोरदार स्वागत केले, स्वागतासाठी फटाके हार पुष्पगुच्छ व ढोल ताशे यांचे आयोजन केले होते व ढोल ताशाच्या प्रचंड गजरात महामंत्री कॉम्रेड वेणू पी नायर यांची रेल्वे स्टेशन रत्नागिरी ते युनियन ऑफिस येथे पर्यंत भव्य रॅली काढण्यात आली.तेथून थेट महामंत्री कॉ वेणू पी नायर यांनी कोंकण रेल्वेतल्या काही कर्मचाऱ्यांसोबत रत्नागिरी येथील प्रसिद्ध ग्रामदैवत श्री काळभैरव देवाचे दर्शन घेतले आणि पुढील वाटचालीसाठी व कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली.रत्नागिरी युनियन कार्यालयातील होम हवन विधी व पूजा कार्यक्रम संपल्यानंतर ठीक 12:30 वाजता युनियन ऑफिस उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली महामंत्री कॉम्रेड वेणू पी नायर यांच्या हस्ते फीत कापण्यात आली तसेच उद्घाटन फलकाचे अनावरण करुण कोकण रेल्वेतील रत्नागिरी शाखेच्या युनियन कार्यालयाचे लोकार्पण झाले या सोहळ्यात रत्नागिरीचे आरआरएम श्री शैलेश बापट सर, डेप्युटी चीफ इंजिनियर (कार्य) श्री राजू पटकर सर व रत्नागिरी रिजनचे अन्याधिकारी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे पदाधिकारी, सदस्य व कर्मचारी उपस्थित होते. सोहळ्यानंतर अधिकाऱ्यांसोबत सर्व कर्मचाऱ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला
